भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : माहे एप्रिलचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 17 एप्रिल
2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय,
कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा
पाटील यांनी दिली आहे.
या लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात.
तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत,
असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले आहे.