भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): परिवहन संवर्ग वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FL की दिनांक
21 एप्रिल 2023 पर्यंत संपणे अपेक्षित आहे. तदनंतर या कार्यालयामार्फत नवीन परिवहन संवर्ग नोंदणी मालिका
MH09-GJ दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दिनांक 17 एप्रिल रोजी
सकाळी 9.45 ते 4 या वेळत खिड़की क्रमांक 9 (परिवहन विभाग) येथे स्विकारण्यात येतील, अशी माहिती
प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.
वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे-
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft
(धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft
(धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर
कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच
Demand Draft (धनाकर्ष) दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9.45 ते 3 या वेळेत कार्यालयात सादर
करावा. 17 एप्रिल 2023 रोजी 4 वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या याद्या
प्रसिद्ध केल्या जातील. Demand Draft (धनाकर्ष) शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच
असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल
क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी
अर्जदारांकडून दिनांक 18 एप्रिल रोजी जादा रकमेचा स्वतंत्र Demand Draft (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात
सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहिल. एक पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी
क्रमांकाचा लिलाव दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त
अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. लिलावास येताना
अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी राहणार असल्यास त्यांच्याकडे
प्राधिकारपत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न
असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता लिहावा. मोबाईल नंबर पुन्हा बदलता येत नाही याची नोंद घ्यावी.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30
दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतली तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक अपोआप रद्द होईल व शुल्क सरकार
जमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. वाहन
धारकाने आरक्षित क्रमांकाला अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आरक्षित क्रमांकाचा संदेश प्राप्त
झाल्यानंतर त्याच दिवशी कार्यालयीन वेळेत समक्ष किंवा संदेश प्राप्त झाल्यानंतर समक्ष येवून पावतीची खात्री
करुन घ्यावी व पावतीत कोणत्याही प्रकारची चूक असल्यास दुरुस्त करुन घ्यावी. तद्नंतर कोणतीही चूक दुरुस्त
करता येत नसल्याने त्यास कार्यालय जबाबदार असणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही श्री. पाटील यांनी
कळविले आहे.