भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे
आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस
निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण)
नियम, 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल
रेखावार यांनी मान्यता दिली आहे.
कोणत्याही ध्वनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या परिसरामध्ये कोणतीही सुट राहणार नाही. तसेच ध्वनीवर्धक /
ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.
रेखावार यांनी कळविले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती -1 दिवस, शिवजयंती (पारंपारिक)- 1 दिवस, मोहरम- 1 दिवस-नववा
दिवस (खत्तलरात्र), दहीहंडी-1 दिवस (गोपाळकाला), गणपती उत्सव, ईद-ए-मिलाद- गणेशोत्सव- 4 दिवस
(पहिला, आठवा, नववा व दहावा दिवस ) ईद-ए-मिलाद, नवरात्री उत्सव- 3 दिवस (पहिला, आठवा व नववा
दिवस), दिपावली- 1 दिवस (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस- 1 दिवस, 31 डिसेंबर 1 दिवस व 1 दिवस आवश्यतेनुसार
महत्वाच्या कार्यक्रमासाठी सुट घोषीत करण्यात येत आहे.