भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त,
समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने दसरा चौक येथून अभिवादन रॅली काढण्यात आली. या अभिवादन रॅलीस
महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी तसेच समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय निवासी
शाळा, शासकीय वसतिगृहे आणि आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन
रॅली छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दसरा चौक ते बिंदू चौक मार्गाने अभिवादन रॅली
घेण्यात आली.
ऐतिहासिक बिंदू चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. प्रकाश नाईक व प्रा. शरद
गायकवाड यांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन
करण्यात आले. यानंतर कुणाल कांबळे व सहकारी यांनी त्यांच्या गीतामधून महात्मा ज्योतिराव फुले व
सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याला उजाळा देत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर गीतामधून मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन
तालुका समन्वयक सचिन परब यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच समाज कल्याण कार्यालयाचे सर्व
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.