भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका): ग्रामीण भागात 44 हजार व शहरी भागात 59 हजार वार्षिक उत्पन्न
असणाऱ्या परंतु, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसलेल्या कुटूंबांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ
घेण्यासाठी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल
रेखावार यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्याचा
लाभ दिला जातो. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत प्राधान्य कुटुंब योजनेचा पुरेसा इष्टांक शिल्लक असल्याची माहिती
जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.