भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि.31 (जिमाका) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कोल्हापूर
जिल्हा व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, कोल्हापूर कार्यालयामार्फत मार्च २०२३ पासून नोंदीत बांधकाम
कामगारांचे विविध कल्याणकारी योजनेचे ऑनलाईन पध्दतीने मान्यता देऊन लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट
खात्यावर (DBT द्वारे) जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. संबंधित नोंदीत बांधकाम कामगारांना लाभ मंजूर
झाला आहे अथवा लाभाच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचे त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अवगत केले आहे. लाभ
मंजूर झाल्यानंतर कामगारांनी कोणत्याही खासगी इसमास वा एजंट यांच्याकडे संपर्क करु नये. लाभाच्या
अर्जाच्या त्रुटीबाबत संबंधित कामगारांनी पोर्टलवर सात दिवसाच्या आत पुर्तता करावी. त्रुटीबाबत काही तांत्रिक
अडचणी व शंका असल्यास कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके
यांनी केले आहे.