भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर : या वर्षी च्या जोतिबा यात्रे मधील दुचाकी दुरुस्ती व पंक्चर सेवेला दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी राधेय ऑटो शनिवार पेठ कोल्हापूर इथून सुरवात झाली. सेवेचे उद्घाटन श्री अजित मोरे(दादा), प्रजासत्ताक संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्री दिलीप देसाई,श्रुतिका लॅब चे मालक डॉ राजेंद्र चिंचणीकर, पुढारी चे सह संपादक श्री मांडवकर साहेब, पुढारी चे श्री विक्रम रेपे, गंधार लुब्रिकेन्ट्स चे स्टेट हेड श्री किशोर माने, अपोलो टायर चे हेड श्री भगवान सावंत, सुशितो इंटरप्राझेस चे मालक श्री तोडकर साहेब, ए पी टूल्स चे मालक श्री प्रशांत सुभेदार, श्रीकृष्णा इलेक्ट्रॉनिक चे मालक श्री अभि चव्हाण व त्यांच्या मातोश्री श्रीमती विद्या चव्हाण मॅडम, प्रा वैभव पाटणकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. हे सेवा 4 व 5 एप्रिल अशी दोन दिवस जोतिबा डोंगर येथे असणार आहे. या सेवे चे नियोजन असोसिएशनचे नियोजन प्रमुख श्री संजय पाटणकर यांच्या सह श्री विनोद म्हाळुंगे, श्री प्रवीण देवेकर, श्री प्रशांत साळुंखे,श्री रवी चिले, श्री संदीप कदम, श्री संदीप पाटील , श्री प्रशांत जाधव, श्री शिवाजी लोहार, श्री अभि हणबर, श्री गणेश विभूते, श्री शीतल ढवळे, श्री सुशांत माळी, श्री अक्षय माळी, ,श्री राजेंद्र सुतार, श्री कृष्णात पाटील, श्री विजय केदार, श्री म्हाळु पुजारी, श्री अतुल भोसले, श्री शिवराज पागाडे, श्री भारत पाटील, विष्णू कुंभार, श्री अशोक सुतार, श्री बंडा सनदी, श्री शहाजी पाटील, श्री मतीन मुल्लानी, श्री जावेद जमादार आदीं सह मॅकेनिक्स उपस्थित होते.
सदरच्या उपक्रमात न्यू पॉलिटेक्निक उंचगाव च्या ऑटोमोबाईल विभाग यांचे सहकार्य लाभले