भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि.30 (जिमाका) : गेल्या पाच दिवसांपासून राशिवडे ता.राधानगरी येथे
आयोजित कोल्हापूर जिल्हा कृषि महोत्सवाचा आज सांगता समारोप झाला.
महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश
आबीटकर, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी जालिंदर पांगरे, कृषि उपसंचालक रविंद्र पाठक, रेशीम अधिकारी रेश्मा
चंदनशिवे आदींसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, शासकीय अधिकारी कर्मचारी
उपस्थित होते.
शेतकरी मार्गदर्शन सत्राला आज निंबराज निंबाळकर यांनी गूळ उत्पादन,
मोहन कदम यांनी मधुमक्षिका पालन, मंगेश बेंडखळे यांनी चारा प्रक्रिया, मकरंद
जोशी यांनी सेंद्रिय खत निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणा-या, प्रयोगशील शेतक-यांचा यावेळी
मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हा कृषि महोत्सवाला जिल्ह्यातील
जवळपास दोन लाख लोकांनी भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची
माहिती घेतली.