भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि.29(जिमाका) : सहकार क्षेत्राच्या प्रगतीच्या उद्देशाने राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे
आयोजित कोल्हापूर जिल्हा कृषी महोत्सवामध्ये आजचे सत्र जिल्ह्यातील आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, पणन
उपसंचालक सुभाष घुले, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवी साखरे,सनदी लेखापाल सुनील नागावकर, कृषी
पर्यटनचे सहाय्यक संचालक सुप्रिया करमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर जालिंदर पांगरे, कृषी
उपसंचालक रवींद्र पाठक आणि राशीवडे गावच्या सरपंच संजीवनी पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर जिल्हा आहे. सहकाराच्या माध्यमातून युवा पिढीला
रोजगाराच्या नवीन संधी आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने या परिषदचे आयोजन करण्यात आले.
पणन उपसंचालक सुभाष घुले यांनी पणन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवी साखरे यांनी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती
बाबत माहिती दिली. सनदी लेखापाल सुनील नागावकर यांनी सहकार कायदे व सेवा संस्थांचा गाव विकासामध्ये
सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. कृषी पर्यटनच्या सहाय्यक संचालक सुप्रिया करमकर यांनी कृषी पर्यटन हा
शेतकऱ्याला उत्पन्न मिळवून देण्यारा कृषी पूरक व्यवसाय असल्याचे सांगितले.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी कृषी महोत्सवाची आवश्यकता याबाबत
मार्गदर्शन करताना कृषी महोत्सवांमधून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळून त्यांच्या उत्पादनात
वाढ होते, असे सांगितले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदराव शिंदे यांनी केले. राशिवडे परिसरासह जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.