भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर : 2001 पासून कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मॅकेनिक्स असोसिएशन जोतिबा यात्रे मध्ये दु चाकी दुरुस्ती व पंक्चर सेवा मोफत पणे देत आहेत. या वर्षी देखील 50 हुन अधिक मॅकेनिक्स सह ही सेवा दोन दिवस देण्यात येणार असल्याचे मॅकेनिक असोसिएशनकडून सांगण्यात आले .
या उपक्रमाचे नियोजन श्री संजय पाटणकर,प्रा वैभव पाटणकर,विनोद म्हाळुंगे,प्रवीण देवेकर,अभि चव्हाण,किसन नांगरे,प्रशांत साळुंखे, शिवाजी लोहार,अभि पोवार,संदीप कदम,संदीप पाटील,राजेश कारंडे,शहाजी पाटील,वैभव शिंदे,अभि हणबर,गणेश विभूते,
शीतल ढवळे,रवी चिले,संदीप सनदी,अशोक सुतार,विष्णू कुंभार,राजेश सुतार यांनी केले.